Ganja Pudhari
सांगली

Sangli Ganja Seized : आटपाडीत तीन किलो गांजासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दडसवाडी–उंबरगाव परिसरात पोलिसांची अमली पदार्थ वाहतुकीवर धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : तालुक्यातील दडसवाडी–उंबरगाव परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ वाहतुकीवर धडक कारवाई करत ३ किलो १८५ ग्रॅम सुका गांजा आणि मोटारीसह तब्बल १० लाख ३१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या वेळी गांजा बाळगणारा संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दडसवाडी–उंबरगाव परिसरातील एका आलिशान मोटारीतून (एमएच १० ईव्ही ७५६६) गांजाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईदरम्यान मोटारीच्या काचा फुटलेल्या आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या कपड्यात बांधलेला ३१ हजार ८५० रुपये किमतीचा ३ किलो १८५ ग्रॅम सुका गांजा, एक सत्तुर आणि दोन रिकामी पोती मिळून आली. पोलिसांनी गांजासह १० लाख रुपये किमतीची मोटार जप्त केली आहे.

गांजाची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी हवालदार अमोल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. फरार संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT