शेटफळेत एकाच रात्री आठ घरफोड्या  pudhari file photo
सांगली

Sangli Burglary Case : शेटफळेत एकाच रात्री आठ घरफोड्या

लाखोंचा ऐवज लंपास ः गावात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः शेटफळे गावात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री आठ घरांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मालिकेतील घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, गावात भीतीचे सावट पसरले आहे.

भारतीय सैन्यात कार्यरत असलेले तानाजी गायकवाड आणि प्रशांत गायकवाड यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. कडी-कोयंडे कापून घरात प्रवेश करत चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. तानाजी गायकवाड यांच्या घरातून चांदीचे साहित्य, तर प्रशांत गायकवाड यांच्या घरातून अंदाजे एक तोळा सोने लंपास केले.

याशिवाय नवनाथ गायकवाड, नारायण गायकवाड, मोहन मोकाशी, भागवत मोकाशी, श्रीमंत भोरे आणि प्रकाश गायकवाड यांच्या घरांमध्येही चोरी झाली आहे. चोरट्यांनी शेजारील घरांचे दरवाजे बाहेरून कडी लावून ही चोरी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असली, तरी गुन्हा दाखल न झाल्याने चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका अंदाज स्पष्ट झालेला नाही.

सात ते आठजणांची टोळी

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सात ते आठ जणांची टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही टोळी सराईत असल्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी गस्त वाढवावी

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT