Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : आटपाडीत मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

आठवड्याभरापूर्वी अपघात ः सांगोल्यातील चालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी शहरातील सिद्धनाथ चित्रमंदिर चौक ते माणगंगा साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला भरधाव मोटारीने धडक दिली होती. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहाजी शिवाजी देशमुख (वय 60, रा. खटकाळे मळा, आटपाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवार, दि. 8 फेब्रुवारीरोजी हा अपघात घडला होता. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास शहाजी देशमुख हे माणगंगा साखर कारखाना रस्त्यावरून पायी जात होते. ते भारत पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या मोटारीने (क्र. एमएच 45 एडी 6436) त्यांना जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी त्यांचे पुतणे उदयसिंह तानाजी देशमुख (वय 37) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारचालक अण्णा कृष्णा बेहेरे (रा. चिंचोली, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT