मलाच तिकीट द्या...; सांगलीत इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती pudhari photo
सांगली

मलाच तिकीट द्या...; सांगलीत इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : 'इतकी वर्षे झाली, मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. खूप काम केले आहे. आंदोलने केली आहेत. पक्षासाठी राबलो आहे. माझ्या मतदारसंघातून मलाच तिकीट मिळावे, ही अपेक्षा आहे...' आमदारकीसाठी इच्छुक असलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मुलाखती देत होते आणि सांगली जिल्हा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक खासदार प्रणिती शिंदे त्याची नोंद करून घेत होत्या.

खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवनात शुक्रवारी मुलाखती घेतल्या. यावेळी खासदार विशाल पाटील उपस्थित होते. इच्छुकांत शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, मिरजेतून मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर, धनराज सातपुते, शशीकांत बनसोडे, दयाधन सोनवणे, रवींद्र कोलप, नंदादेवी कोलप, अरुण धोतरे, इस्लामपूरमधून मनीषा रोटे व जितेंद्र पाटील, शिराळ्यातून रवी पाटील, खानापूर-आटपाडीमधून रवीकांत भगत व गजानन सुतार, जतमधून आमदार विक्रम सावंत व तुकाराम माळी यांनी मुलाखती दिल्या.

मुलाखतींचा अहवाल प्रदेश काँग्रेस समितीकडे सादर करणार आहे. त्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील.
प्रणिती शिंदे, खासदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT