सांगली

Sangli: आष्ट्यात अभ्यासिकेवर पालिकेचा डोळा

आंदोलनाचा इशारा; मागासवर्गीय ढोर समाजाची इमारत बळकावण्याचा डाव

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : ‘गरिबांच्या मुलांनी शिकायचे की नाही?’ असा संतप्त सवाल करत येथील वीरशैव कक्कया (ढोर) समाजाने सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने मागासवर्गीय ढोर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून बांधलेली अभ्यासिकेची इमारत सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांच्या दबावाखाली काढून घेण्याचा डाव रचला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या या अन्यायकारक भूमिकेमुळे समाजबांधव आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

येथील प्रभाग क्रमांक एकमधील ढोर समाजाच्या नागरिकांची घरे लहान असल्याने, मुलांच्या अभ्यासाची गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून सन १९९९ मध्ये सिटी सर्व्हे नंबर १६२५ मधील जागेत ही अभ्यासिका बांधण्यात आली आहे.

समाजाच्या हक्काची ही इमारत तब्बल २२ वर्षे समाजाला न देता पालिकेने स्वतःच्या ताब्यात ठेवली. एवढेच नव्हे तर इमारतीचा मूळ दरवाजा बंद करून दुसरीकडे दरवाजा पाडला आणि तिथे शिवण क्लास व रुग्णालय सुरू केले. पाच वर्षांपूर्वी क्लास व रुग्णालय बंद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT