accident file photo
सांगली

Sangli accident: अंकलखोप येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अंकलखोप (ता. पलूस) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : अंकलखोप (ता. पलूस) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बबन भाऊ कुंभोजकर (वय 75, रा. अंकलखोप) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवार दि. 22 एप्रिलरोजी दुपारी 3 वाजता घडला.

बबन कुंभोजकर हे दुचाकीवरुन (एमएच 10 डी 2169) अंकलखोपहून भिलवडीकडे जात होते. भगतसिंग हायस्कूलजवळ मागून वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात कुंभोजकर काही अंतरापर्यंत रस्त्यावर फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला, हाताला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भिलवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT