पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद अमिन मुल्ला (वय ३७, रा. वाझर रोड, आंधळी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. २ जुलै रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.१० या वेळेत मुल्ला यांचे कुटुंब बाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप कापून आत प्रवेश केला.
बेडरूममधील ड्रेसिंग कपाटाचे कुलूप तोडून आतील सुमारे १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि ६ ग्रॅम वजनाचे गंठण असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मुल्ला कुटुंब घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक जयसिंगराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.