Accident  
सांगली

Sangli Accident: अलकूडजवळ मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूडजवळ मंगळवार, दि. २८ रोजी सकाळी मोटारीने दुचाकीस धडक दिल्याने देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

गजानन बबन पाटील (वय ५६, रा. देशिंग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते अलकूड येथील शिवगंगा पाईप कंपनीत कामासाठी जात असताना हा अपघात झाला. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गजानन पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीटी २८७३) मिरजच्या दिशेने चालले होते.

त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने (क्र. जीजे १२ एफसी ८२४५) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही मोटार प्रशांत अशोक माने (रा. पाठकोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) चालवत होते. धडक इतकी भीषण होती की, गजानन पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT