Pudhari Agripandhari Exhibition: सांगलीत आजपासून ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’  Pudhari
सांगली

Pudhari Agripandhari Exhibition: सांगलीत आजपासून ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’

चार दिवस सुरू राहणार कृषी-तंत्रज्ञानाचे भव्य दालन; भेट देणाऱ्या प्रत्येकास पंधराशे रुपयांचे हमखास गिफ्ट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शेतकऱ्यांच्या प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सांगलीत आयोजित होणारा ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ हा भव्य कृषी सोहळा आज, शुक्रवार दि. 20 पासून सांगलीत सुरू होत आहे. दै. ‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

सांगलीच्या विश्रामबाग येथील विलिंग्डन कॉलेज कंपाऊंडमधील छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी अशोक काकडे, ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्यूट्रिएंट्‌‍सचे दीपक राजमाने, अ हेवन हॉलिडेजचे चेअरमन राजेंद्र बुगडे, बी. जी. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे, कन्हैया ॲग््राोचे प्रॉडक्शन मॅनेजर दीपक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे आणि सोनरूपम जेम्स अँड ज्वेलरीचे विभागीय व्यवस्थापक विजय नक्षीकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. प्रदर्शनास राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.

बारामतीनंतर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पीक प्रात्यक्षिके सांगलीत आयोजित करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली मशागत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संतुलित पोषण मूल्यांच्या जोरावर 75 पेक्षा जास्त प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फुलांचे प्लॉट्‌‍स आता पूर्ण बहरात आले आहेत. शेतात डौलणारी ही भरघोस पिके पाहणे, हा शेतकऱ्यांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव ठरणार आहे.

प्रदर्शनाची खास आकर्षणे : लाईव्ह क्रॉप डेमो : शेतात प्रत्यक्ष उभी पिके पाहून विक्रमी उत्पादनाचे ‌‘गुपित‌’ जाणून घेण्याची संधी.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र तज्ज्ञांकडून थेट शिकता येईल.

प्रदर्शन : औषधे, दर्जेदार बी-बियाणे आणि अत्याधुनिक शेती अवजारांचे शेकडो स्टॉल्स एकाच छताखाली.

अधिक माहितीसाठी : 9545327545.

वेळ आणि ठिकाण...

दिनांक : शुक्रवार, दि. 20 ते सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026

वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 7.00

ठिकाण : विलिंग्डन कॉलेज कंपाऊंड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय परिसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT