कृषी दुकान FilePhoto
सांगली

Sangli News : जिल्ह्यातील 14 कृषी दुकानांचे परवाने निलंबित

कृषी विभागाची 65 बियाणे विक्री केंद्रांना नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः गेल्या पंधरवड्यात ई-पॉस मशीनमधील साठ्यात तफावत आढळलेल्या 65 विक्री केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, 14 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

कुंभार म्हणाले, जून महिन्यातील संभाव्य मागणी लक्षात घेऊन एप्रिल आणि मे महिन्यात खतांचा पुरेसा साठा करून ठेवण्यावर भर दिला जात आहे. खतांसोबत इतर उत्पादने किंवा निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती (लिंकिंग) करू नये, तसेच अधिकृत विक्री किमतीपेक्षा जास्त दराने युरियाची विक्री करू नये, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. विक्रेत्यांनी उपलब्ध साठा आणि दरफलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असून, या सर्व बाबींवर कृषी विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अनुदानित रासायनिक खतांचा, विशेषतः युरियाचा अकृषक कामांसाठी वापर, काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT