नियमबाह्य एलईडी बल्ब बसवणाऱ्यावर कारवाई 
सांगली

Sangli News : नियमबाह्य एलईडी बल्ब बसवणाऱ्यावर कारवाई

‌‘आरटीओ‌’ची मोहीम; हजारभर वाहनांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वाहनांवरील नियमबाह्य एलईडी बल्ब आणि जादा लाईट लावणाऱ्या वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. प्रखर एलईडी दिव्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपून काही सेकंद समोरील काहीच दिसत नाही. त्यामुळे चालकांचे वाहनांवर नियंत्रण न राहता अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रकार जीवावर बेतू शकतो. यामुळे अशा प्रखर दिव्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

प्रखर एलईडी दिव्यांना झटका

कारवाईचा कालावधी ः एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026

वायुवेग पथकामार्फत 939 वाहनांवर कारवाई

4 लाख 1 हजार 700 रुपये दंड वसूल

प्रखर एलईडी दिवे बसवल्याबद्दल मार्च 2026 मध्ये 105 वाहनांवर कारवाई

54 हजार 500 रुपये दंड वसूल

तेरा महिन्यांमध्ये एकूण 1 हजार 41 वाहन चालकांवर कारवाई

4 लाख 56 हजार रुपये दंड वसूल

वाहनांना नियमबाह्य पद्धतीने अतिशय प्रखर एलईडी दिवे बसवू नयेत. बसविलेले नियमबाह्य दिवे काढावेत. जेणेकरून इतर वाहनधारकांच्या जीवास धोका निर्माण होणार नाही. असे न केल्यास संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.
- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT