Cattle Smuggling Pudhari File Photo
सांगली

Sangli Cattle Smuggling : जनावरांची अवैध वाहतूक

बिळूर येथे कारवाई; कर्नाटकातील दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

जत : बिळूर (ता. जत) येथे जनावरांना क्रूरपणे वागणूक देत त्यांची अवैध वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जनावरे आणि एक टेम्पो असा ९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांवर गुन्हा दाखल करत कर्नाटक राज्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री बिळूर येथे हा प्रकार घडला. जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था न करता, अपुऱ्या जागेत दाटीवाटीने भरून, बेकायदेशीररीत्या कतलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात असल्याचे कारवाईदरम्यान आढळून आले.

या कारवाईत आठ बैल, दोन जर्सी गाई आणि अन्य चार जर्सी गाई, अशी १४ जनावरे जप्त केली. या जनावरांची किंमत १ लाख ४० हजार रुपये असून, कर्नाटक पासिंगच्या वाहनाची किंमत ८ लाख रुपये आहे. असा एकूण ९ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खुशाबा शिवपुजी (वय २९, रा. बिळूर, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाप्पा यल्लाप्पा हादीमनी (वय २५), हणमंत फकिरआप्पा नंदी (वय २३, दोघे रा. गोकाक, जि. बेळगाव) व विशाल कांबळे (रा. जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT