जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात तीन ठिकाणच्या वेगवेगळ्या अपघातात २२ जण जखमी झाल्याची घटना घडली. यात अचकनहळ्ळी येथे ऊसतोड मजुराचा ट्रक पलटी होऊन १८ जण जखमी झाले आहेत. तर असांगीजवळ (जत ) ट्रक आणि मोटरसायकल समोर झालेल्या धडकेत दोन दोघेजण जखमी झाले आहेत. तिसरी घटना विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर बिरनाळ फाट्यानजीक मोटरसायकल घसरून अपघात झाल्याने दोघे जखमी झाले आहेत. तिन्ही अपघातात उमदी व जत पोलिसात नोंद झाले आहेत. ही अपघात शुक्रवारी व शनिवारी घडले आहेत. तालुक्यातील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी अचकनहळ्ळी येथे शुक्रवारी रात्री ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. हा ट्रक जालना येथील असून ऊसतोड मजुरांना घेऊन तो कर्नाटकात निघाला होता. अचकनहळ्ळी गावाजवळ एका वळणावर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यामध्ये अठरा मजूर होते. हे सर्व मजूर जखमी झाले. ते जालना येथील आहेत. जखमीत एका अडीच वर्षाच्या बालकासह १३ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
अचकनहळ्ळी जवळ झालेल्या ट्रक अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे शिवम पुंडलिक आरे, प्रतीक्षा कुंडलिक आरे, सागर भरमा लोंढे, पुनम सागर लोंढे, दिव्या दीपक लोंढे ,सीमा दत्ता जाधव, इंदुबाई सूर्यभान जाधव, नवनाथ सूर्यभान जाधव, प्रियंका बाळू साळवे, बाळू पंडित साळवे, बाळू भगवान लोंढे, सुवर्णा केशव नामदास, दत्ता सूर्यभान जाधव, चुटकी राजेश गायकवाड, पायल सागर लोंढे, पूजा दीपक लोंढे माधवी केशव नामदास, तुषार दत्ता जाधव हे सर्व जण राहणार जालना येथील आहेत. ऊसतोडी साठी कर्नाटक येथे जाताना हा अपघात घडला आहे ट्रकला अपघात झाल्यानंतर जतच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्यांना सांगली, मिरज येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर बिरनाळ नजीक दुचाकी घसरल्याने अपघातात दोघे जखमी झाले आहेत निखिल अरविंद चव्हाण व अभिषेक पांडू चव्हाण हे दोघे दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेत दोघेही विजापूर येथील रहिवासी आहेत.
जत आसंगी येथील संख रस्त्यावर गावालगाच्या कॉर्नर जवळ ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकल व ट्रकच्या धडकेत दिलीप कृष्णा पूदे व दत्ता महादेव सासणे हे दोघे गंभीर झाले आहेत. सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहेत.दरम्यान ट्रक चालक फरार आहे.
हेही वाचा