Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : येलूरजवळ बसची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) हद्दीत समाधान हॉटेलजवळ बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) हद्दीत समाधान हॉटेलजवळ बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. किशोर श्रीकांत पाटील (वय ३४, मूळ रा. मिणचे-सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर; सध्या रा. येलूर, ता. वाळवा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात मंगळवार, दि. ६ ऑक्टोबररोजी रात्री घडला.

याबाबत अभिजित शिवाजीराव पाटील (वय ४४, रा. येलूर) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातप्रकरणी बसचालक राहुल शांताराम कनाके (रा. दोनोडा, ता. कळम, जि. यवतमाळ; सध्या वसई डेपो, जि. पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कनाके हे बस (क्र. एमएच १४ एमएच ५६३१) घेऊन पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. येलूर हद्दीतील समाधान हॉटेलजवळ समोर चाललेल्या दुचाकीला (क्र. एमएच ०९ डीडब्ल्यू २२६९) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत किशोर पाटील हे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहातक उपनिरीक्षक महादेव खोत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT