मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशाल धोंडिराम भंडारे (वय २६, रा. टाकळी, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विशाल भंडारे हे बेळंकी येथे एका हॉटेलमध्ये कामास होते. ते दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता हॉटेलमधील काम आटोपून टाकळीकडे येत होते. यावेळी बेळंकी ते शिपूरदरम्यान असणाऱ्या गंगाटेक येथे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने विशाल भंडारे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.