सांगली : मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे दोन पिकअप् वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह तिघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवार, दि. 5 रोजी रात्री अकरा वाजता घडला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
रमेश मारुती रुपनर (वय 50, रा. सिद्धेश्वर प्लॉट, पंचशील नगर, सांगली, मूळ रा. मेडशिंगी, ता. सांगोला), रियाज अब्दूल मोमीन (वय 55, रा. तासगाव) व जोतिराम चव्हाण अशी जखमींची नावे आहेत. यातील रुपनर व मोमीन वाहनचालक आहेत. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपनर हे सांगलीतून गोव्याला पिकअप् घेऊन निघाले होते. अंकली फाट्याच्या अलीकडे कोल्हापूरकडून येणार्या पिकअप्चे चालक मोमीन यांचा ताबा तुटून दुभाजकावरून पिकअप दुसर्या बाजूला गेली.
यावेळी मोमीन यांच्या पिकअप्ची रुपनर यांच्या पिकअप्ला धडक बसली. या रुपनर यांच्यासह त्यांचे मित्र जोतिराम चव्हाण जखमी झाले. तर मोमीन हेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.