Accident  
सांगली

Sangli Accident: माळवाडीत मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

भिलवडी-तासगाव रस्त्यावर अपघात; चालकास अटक

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथे भिलवडी-तासगाव रस्त्यावरील नवीन एस. टी. स्टँडसमोर शुक्रवारी रात्री भरधाव मोटारीने धडक दिल्याने भीमराव हनुमंत सुपणेकर (वय ४०, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, बागडी समाज, माळवाडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंकुश बळवंत सुपनेकर यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार, दि. १९ जून रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात भीमराव सुपनेकर यांच्या दोन्ही पायांना व शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शनिवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी अंकुश बळवंत सुपनेकर (वय २७, व्यवसाय-मजुरी, रा. चव्हाण प्लॉट, माळवाडी, ता. पलूस) यांच्या तक्रारीवरून शनिवारी २० जून रोजी भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास पावशे करत आहेत.

कुटुंबाचा आधार हरपला

मृत भीमराव सुपनेकर यांच्या पत्नी आणि वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात घरात वृद्ध आई आणि दोन मुली असून, त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी भीमराव यांच्यावरच होती. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हिरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT