Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

अभयनगर येथे भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अभयनगर येथे भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. यशवंत बाबुराव शिंदे (वय ७१, रा. अभयनगर, सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नंदिनी यशवंत शिंदे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चिदानंद श्रीशैल चौगुले (वय २१, रा. शामनगर, कुपवाड) या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील मृत यशवंत शिंदे हे १० तारखेला अभयनगर येथून निघाले होते. ते रिक्षा थांब्याजवळ आले असता, संशयित चिदानंद चौगुले याने दुचाकी भरधाव वेगाने चालवून यशवंत शिंदे यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT