कवठेमहांकाळ : मोटरसायकलवरून पडल्याने महिला जागीच ठार झाली. नंदा लक्ष्मण शिंदे (वय 59, रा. कुसबावडे, ता. खानापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना दि. 27 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
नंदा या औषध आणण्यासाठी कवठेमहांकाळला पुतण्याच्या मोटरसायकलवरून येत होत्या. दरम्यान, पाठीमागे बसलेल्या नंदा या दुचाकीवरून पडल्याने यांचा मृत्यू झाला. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. नंदा शिंदे यांचे पती लक्ष्मण किसन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
नंदा या त्यांचा पुतण्या अमित राम शिंदे याच्या दुचाकीवरून (एमएच 03 ए क्यु 7067) कवठेमहांकाळ येथे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. मोटरसायकल जाखापूर हद्दीत आली असता नंदा या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादीनुसार आरोपी अमित राम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मोटरसायकलचे 2000 रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास पोलिस नाईक बाबासाहेब व्हटकर करत आहेत.