सुळेवाडीजवळ अपघातात सहा जखमी 
सांगली

Sangli Accident : सुळेवाडीजवळ अपघातात सहा जखमी

कार उलटली, दोन गंभीर

पुढारी वृत्तसेवा

विटा : विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्या जवळील सुळेवाडी येथे झालेल्या मोटार उलटून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले. हा अपघात बुधवार, दि. 25 रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील काहीजण (एमएच 14 एमटी 0918) या मोटारीतून आरेवाडी येथून देवदर्शन करून विजापूर - गुहागर महामार्गावरून पुण्याकडे परत निघाले होते. विट्याच्या अलीकडेच सुळेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता, चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या जाहिरातीच्या होर्डिंगवर जाऊन धडकली आणि रस्त्यावरून खाली कोसळली. कोलांट्या घेत रस्त्याखाली गेल्याने मोटारीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात मोटारीतील सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये गौरी नरुटे (वय 21), सुनीता पोपट महानवार (वय 60), विश्वंभर आप्पासाहेब नरुटे (वय 52), लक्ष्मी विश्वंभर नरुटे (वय 38), सविता अण्णा मदने (वय 40) आणि उषाबाई आप्पासाहेब नरुटे (वय 60) यांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून मदतकार्य सुरू केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT