कवठेमहांकाळ : दिघंची–हेरवाड राज्यमार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव हद्दीतील एका हॉटेलसमोर दोन दुचाकींची धडक होऊन एका ६४ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. धोंडिराम विठोबा पाटोळे (वय ६४, रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम पाटोळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. काम आटोपून घराकडे परत जात असताना हिंगणगाव हद्दीत एका हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातात पाटोळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचा क्रमांक अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.