Accident file photo
सांगली

Sangli Accident: डफळापूरजवळ वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

जत तालुक्यातील डफळापूर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्यातील डफळापूर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास डफळापूर ते कवठेमहांकाळ मार्गावर गोपाळ रामा संकपाळ (वय 73, रा. डफळापूर, ता. जत) हे रस्त्याने चालत जात होते. त्यावेळी वाहन चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर चालकाने जखमी वृद्धाला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोपाळ संकपाळ यांचा मृत्यू झाला. याबाबत कुमार गोपाळ संकपाळ यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT