Accident Pudhari
सांगली

Sangli Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रायगाव येथे जुना सातारा रस्त्यावर ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव शहर : रायगाव (ता. कडेगाव) येथे जुना सातारा रस्त्यावर ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. शशिबिंद कुमार राम (वय 27, रा. खेरडीह, बिहार, सध्या रायगाव कारखाना कॉलनी) असे मृताचे नाव आहे. अपघातात कन्हैया कुमार राम (वय 29, रा. राम खयाली रामविल्ह, बिहार, सध्या रायगाव कारखाना कॉलनी) हा जखमी झाला आहे. ही घटना बुधवार, दि. 26 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत राज बब्बर राम (रा. खिरडीह, बिहार, सध्या रायगाव कारखाना कॉलनी) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शशिबिंद कुमार राम व कन्हैया कुमार राम हे दोघे दुचाकीवरुन (क्र. एमएच 09 जीक्यू 0461) जुना सातारा रस्त्याने रायगाव कारखान्याकडे निघाले होते. यावेळी ट्रक (क्र. एमएच 11 डीव्ही 1566) भरधाव वेगाने रायगाव कारखाना ते हिंगणगाव बुद्रुक मार्गाने निघाला होता. या ट्रकने समोरुन येणाऱ्या त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शशिबिंद कुमार राम याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला कन्हैया कुमार राम हा गंभीर जखमी झाला. घटनेची नोंद कडेगाव पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT