accident News Pudhari
सांगली

Sangli Accident: सावळी-तानंग रस्त्यावर मालवाहतूक रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सावळी ते तानंग रस्त्यावर एका कोल्ड स्टोअरेजसमोर मालवाहतूक रिक्षा चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : सावळी ते तानंग रस्त्यावर एका कोल्ड स्टोअरेजसमोर मालवाहतूक रिक्षा चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंदा सिद्धा मेटकरी (वय 45, रा. संजयनगर, सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाताची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी मालवाहतूक रिक्षा चालक विजय गणपती कोरे (वय 47, रा. वांडरे चाळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिरज) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आनंदा मेटकरी हे बुधवारी (दि. 21) दुपारी दुचाकीवरून (एम.एच.09, जीएल 9536) तानंगमार्गे सावळीकडे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहतूक रिक्षा (एम.एच.10 सी.क्यू. 3968) चालक विजय कोरे याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत आनंदा मेटकरी हे रस्त्यावर पडल्याने डोके, हात पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मृत मेटकरी यांचा भाचा दीपक दुधाळ याने मालवाहतूक रिक्षा चालकाविरुद्ध कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मालवाहतूक रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT