Sangli Accident News
गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू 
सांगली

सांगली : दोन कारच्या भीषण धडकेत गोव्यातील महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड (एम) (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत दोन कारची जोरदार धडक झाली. यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या महिलेचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे जखमी झाले. गौरी कुडतळकर (वय 60, रा. अस्नोडा, ता. बार्देश, जि. उत्तर गोवा) असे मृताचे नाव आहे.

कारचालक शहाबाजी राजेंद्र गाड (वय 30, रा. डिचोली, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा ) व सुरेखा शिरोडकर, (60, रा. फटरीवाडा-रेवोडा, ता. बार्देश, जि. उत्तर गोवा) अशी जखमींची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कार (टीएस 07, जे. एल. 3339) चा चालक हर्षत भास्कर पोरेडी (24, रा. हैदराबाद) याचा कारवरील ताबा सुटल्याने या कारने गोव्याहून पंढरपूरच्या दिशेने जाणार्‍या कारला (जी. ए. 03, वाय. 6136) पाठीमागून जोरदार धडक दिली. वाहतूक महामार्ग पोलिस निरीक्षक युवराज पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले.

SCROLL FOR NEXT