सांगली

सांगली: ऊसतोड मजुराचा विहिरीत बुडून मृत्यू

backup backup

सांगली पुढारी वृत्तसेवा: कोतिज (ता. कडेगाव) येथे पाणी आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोड मजुराचा पाय घसरुन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. भरत साहेबराव हिरे (वय 40, रा.पिंपळमोडी, ता. आहवा, जि. आहवाडांग, गुजरात) असे या ऊसतोड मजुराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.21) सायंकाळी येथे घडली. याबाबत रतन गमन गावीत यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोतिज येथे भरत हिरे हा ऊसतोडणीचे काम करीत होता. सोमवारी तो पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी जगन्नाथ पांडुरंग जगताप यांच्या विहिरीत गेला असता तोल जाऊन पाण्यात पडला. विहिरीतही जादा पाणी असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

भरत अजून पाणी घेऊन का आला नाही म्हणून इतर मजुरांनी त्याचा शोध घेतला.तर जगताप यांच्या विहिरीत पाहिले असता तेथे भरत हा पाण्यात मयत अवस्थेत आढळून आला. अधिक तपास पोलिस हवालदार माळी करीत
आहेत.

SCROLL FOR NEXT