fraud Pudhari
सांगली

Sangli Online Fraud: ५१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास गंडा

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : शेअर बाजारात व गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल ५१ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात ‘कोटक सिक्युरिटीज’ कंपनीसह संशयित आण्विक मेहरा आणि कस्टमर सर्व्हिस मॅनेजर संदीप कुमार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग येथील १०० फुटी रस्ता परिसरात राहणारे किरण भालचंद्र कुलकर्णी (वय ६२) यांना संशयितांनी गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. संशयितांनी डिजिटल साधनांचा वापर करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ५१ लाख ५ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांवर भरण्यास भाग पाडले.

काही दिवसांनंतर कुलकर्णी यांनी गुंतवलेली मूळ रक्कम व त्यावर मिळालेला परतावा परत मागितला असता, संशयितांनी ‘व्हॅरिफिकेशन डिपॉझिट’च्या नावाखाली आणखी पैशाची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी तातडीने सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT