जिल्ह्यातील 41 अधिकार्‍यांच्या बदल्या 
सांगली

Sangli News : जिल्ह्यातील 41 अधिकार्‍यांच्या बदल्या

प्रशासकीय कारणास्तव कार्यवाही : तीन अधिकार्‍यांना मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या 41 अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा आदेश जारी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस अधिकार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, नियंत्रण कक्षाचे सहायक निरीक्षक सुहास ठोंबरे यांना एक वर्ष मुदतवाढ दिली. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील (कवठेमहांकाळ ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष), संजय हारूगडे (इस्लामपूर ते सायबर ठाणे), किरण रासकर (मिरज शहर ते आर्थिक गुन्हे शाखा), प्रवीणकुमार कांबळे (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ), किरण चौगले (सांगली ग्रामीण ते मिरज शहर), संजय मोरे (सांगली शहर ते जिल्हा विशेष शाखा), भैरू तळेकर (जिल्हा विशेष शाखा ते सांगली ग्रामीण), प्रदीप सूर्यवंशी (वाचक एक ते नियंत्रण कक्ष), सिद्धेश्वर जंगम (शिराळा ते पलूस), संदीप पाटील (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष ते आष्टा), जंबाजी भोसले (नियंत्रण कक्ष ते शिराळा), बयाजीराव कुरळे (नियंत्रण कक्ष ते आवेदन शाखा), सतीश कदम (आवेदन शाखा ते संजयनगर), महेंद्र दोरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष), सहायक निरीक्षक प्रवीण घाडगे (आर्थिक गुन्हे शाखा ते न्यायालयीन कक्ष), दिनेश काशिद (वाचक शाखा दोन ते वाचक एक), गणेश कोकाटे (आरसीपी ते कडेगाव), सुशांत पाटील (पलूस ते वाचक शाखा 2), दीपक भांडवलकर (कुपवाड ते आर्थिक गुन्हे शाखा), सागर वरूटे (इस्लामपूर ते शिराळा), पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार (सांगली शहर ते स्थानिक गुन्हे अन्वेषण), अविनाश घोरपडे (तासगाव ते वाचक शहर विभाग), सपना अडसूळ (मिरज शहर ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध), विश्वजित गाडवे (कुपवाड ते पलूस), महेश गायकवाड (नियंत्रण कक्ष ते आरसीपी 1) यांची प्रशासकीय बदली झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT