सांगलीत 1524 मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन Pudhari News Network
सांगली

Sangli : सांगलीत 1524 मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन

229 मूर्ती दान : महापालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत रविवारी पाचव्या दिवशी 6024 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी 1 हजार 524 मूर्ती कृत्रिम कुंड, कृत्रिम तळ्यात विसर्जित करण्यात आल्या. 229 मूर्ती महापालिकेच्या मूर्तिदान केंद्रात जमा झाल्या. महापालिकेच्या पर्यावरण पूरक उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी सांगलीत सरकारी घाट, मिरजेत गणेश तलाव, कुपवाडमध्ये विहिरी तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड येथे प्रत्येक प्रभागात कृत्रिम कुंड, कृत्रिम तळे तसेच मूर्तिदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. मूर्तींचे दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारीदेखील पार पाडली जात आहे.

आयुक्तसत्यम गांधी, अतिरिक्तआयुक्तनीलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्तसहदेव कावडे, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, नागेश मद्रासी, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी, अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे. महापालिकेच्या मूर्तिदान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी 229 मूर्तिदान झाल्या. कृत्रिम कुंड, कृत्रिम तळ्यात 1 हजार 524 मूर्तींचे विसर्जन झाले. नदीत 3 हजार 200 मूर्तींचे विसर्जन झाले. 232 मूर्तींचे विहिरीत तसेच मिरजेत गणेश तलावात 700 मूर्तींचे विसर्जन झाले. नऊ टन निर्माल्य जमा झाले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्तिदान, कृत्रिम कुंडातील विसर्जनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे या उपक्रमाचे यश आहे. या उपक्रमामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यात मदत होईल.
सत्यम गांधी, आयुक्त, महानगरपालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT