दिलीप जाधव
कवठेमहांकाळ : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 23 मार्च रोजी मंजुरी दिली. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल.
पहिला टप्पा...
20 फेब्रुवारी 2026 - प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यास प्रारंभ. तहसीलदारांनी गुगल अर्थच्या साहाय्याने प्रत्येक गावाचे नकाशे तयार केले. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवकाकडून संयुक्त पाहणी. त्यानंतर प्रभागांची विभागणी आणि सीमा निश्चित. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मंडल अधिकारी समितीने प्रस्तावास अंतिम स्वरूप. तेथून उपविभागीय अधिकारी, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे.
दुसरा टप्पा..
7 एप्रिल 2026 पासून - हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी.
13 एप्रिल 2026 पर्यंत - हरकती व सूचना सादर करण्याची संधी.
21 एप्रिल 2026 रोजी - सुनावणी उपविभागीय अधिकाऱ्यांपुढे
23 एप्रिल 2026 रोजी - अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
तिसरा टप्पा ...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 28 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम प्रभाग रचना निश्चिती. प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर होणार. 4 मे रोजी - आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंतिम प्रभाग रचनेस प्रसिद्धी.
प्रारूप प्रभाग रचना मंजूर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती...
अप्पर सांगली : अंकली, इनाम धामणी, कवठेपिरान, कर्नाळ, तुंग
आटपाडी : बोंबेवाडी, देशमुखवाडी, धावडवाडी, घरनिकी, लेंगरेवाडी, माडगुळे, पात्रेवाडी, शेटफळे, तळेवाडी, विठलापूर
कडेगाव : अंबक, कोतीज, रामापूर, शिरसगाव, शिवणी, सोनकिरे, येतगाव, कान्हरवाडी, ढाणेवाडी
कवठेमहांकाळ : नांगोळे, इरळी, म्हैसाळ एम, मोघमवाडी, चोरोची, बनेवाडी, थबडेवाडी, तिसंगी, जांभुळवाडी, रायवाडी, निमज
खानापूर : नागेवाडी, माहुली, देविखिंडी, पारे, रेणावी, मेंगाणवाडी, पोसेवाडी, शेडगेवाडी, भडकेवाडी, तांदळगाव, खंबाळे भा., मंगरूळ, भिकवडी बु.
जत : मेंढेगिरी, धावडवाडी, उटगी, कुलाळवाडी, अंकलगी, सोनलगी, निगडी बु., लमाणतांडा द., मोरबगी, भिवर्गी, जालिहाळ खु., सिद्धनाथ, तिकोंडी, वळसंग, उंटवाडी, येळदरी, टोणेवाडी, शेगाव, सिंगनहळ्ळी, कुडणूर, डोर्ली, अंकले, गुगवाड, लमाणतांडा उ., गुड्डापूर, करेवाडी ति., शेड्याळ, घोलेश्वर, सनमडी, उमराणी
तासगाव : आळते, बोरगाव, दहिवडी, धामणी, ढवळी, धुळगाव, डोंगरसोनी, धोंडेवाडी, डोर्ली, गौरगाव, गव्हाण, गोटेवाडी, हातनोली, हातनूर, जरंडी, जुळेवाडी, कौलगे, कवठेएकंद, लोढे, लोकरेवाडी, मांजर्डे, मोराळे पेड, नागाव कवठे, नरसेवाडी, निंबळक, पाडळी, पेड, राजापूर, सावळज, शिरगाव वि., सिद्धेवाडी, तुरची, वाघापूर, वज्रचौंडे, विजयनगर, विसापूर, वडगाव, यमगरवाडी, येळावी
पलूस : भिलवडी स्टेशन, बुरुंगवाडी, आंधळी, नागराळे, माळवाडी, मोराळे, तुपारी, तावदरवाडी, खंडोबाचीवाडी, सूर्यगाव, भिलवडी, नागठाणे, रामानंदनगर, दह्यारी
मिरज : आरग, चाबुकस्वारवाडी, ढवळी, डोंगरवाडी, एरंडोली, भोसे, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, म्हैसाळ, मालगाव, मल्लेवाडी, शिपूर, शिंदेवाडी, विजयनगर, कळंबी, कवलापूर, तानंग
वाळवा : मसुचीवाडी, भाटवाडी
शिराळा : बिळाशी, जांभळेवाडी