सांगली : गणेशोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यातून पुण्यासाठी सुमारे शंभर जादा बसेस मंगळवारी पाठववण्यात आल्या आहेत. या बसेस बुधवारपासून सांगली जिल्ह्यातील दहाही आगारासाठी सेवा देणार आहेत.
पुणे परिसरातून सांगली जिल्ह्यात येणार्या गणेशभक्तासाठी ही सेवा असणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दहा आगारातून दीड दिवसाचा गणपती, पाच दिवसाचा गणपती, त्यानंतर सातवा, नववा दिवस आणि अनंत चतुर्दशीसाठी मागणीप्रमाणे सांगली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यासाठी सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
एसटी कर्मचार्यांना गणेशोत्सावात वेतन...
राज्य शासनाच्या इतर कर्मचार्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे 83 हजार कर्मचारी व अधिकार्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कर्मचार्यांना याचा लाभ होणार आहे. त्यानुसार 25 ऑगस्टरोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकार्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होत आहे.