जिल्ह्यात १.१९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना 
सांगली

Sangli News| जिल्ह्यात १.१९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

दुष्काळाचा रब्बीला फटका; पेरणी क्षेत्रात ४५ टक्के घट; मका क्षेत्र वाढले, ज्वारीमध्ये घट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दुष्काळ आणि अपुऱ्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामाच्या पेरण्यांवर गंभीर परिणाम झाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३९३ हेक्टरपैकी ७५ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजे ३८.८० टक्के पेरणी झाली आहे. अजूनही १.१९ लाख हेक्टर पिक पेरणीविना आहे. पेरणी सुरू असलीतरी यंदा सुमारे ४५ टक्के पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. गतवर्षी १०१ टक्के पेरणी झाली होती. रब्बीची पेरणी सर्वसाधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होते. गव्हाची पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होऊ शकते. यंदा मका क्षेत्रात वाढ झाली असलीतरी हे क्षेत्र चाऱ्यासाठी वाढले आहे. गेल्या सहा वर्षांतील हे निच्चाकी पेरणी आहे.

सांगली जिल्ह्याचे एकूण रब्बी क्षेत्र हे. १ लाख ९४ हजार ३९३ हेक्टर आहे. जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७५ हजार ४२८.४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या प्रमुख पट्ट्यात पाणीटंचाई असून, सरासरी १ लाख २६ हजार २८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ५४ हजार ५६३. २६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याची टक्के ४३.२९ टक्के आहे. गहू आणि हरभरा सिंचनासाठी पाण्याची कमतरता आणि जमिनीतील ओलावा घटल्यामुळे गहू, हरभरा व इतर कोरडवाहू पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे पारंपरिक पिकांऐवजी कमी पाणी लागणाऱ्या मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मका पेरणी आतापर्यंत ११ हजार १४९ हेक्टरवर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT