वारणावती : सह्याद्री व्याघ्र राखीवचा 16 वा वर्धापन दिन कराड येथे तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्सहात झाला.
उपसंचालक, कोयना वन्यजीव विभाग, किरण जगताप, श्रीमती स्नेहलता पाटील, उपसंचालक, चांदोली वन्यजीव विभाग, शतनिक भागवत, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन, प्रबोधिनी, कुंडल, श्रीकांत पवार, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, तसेच सह्याद्री व्याघ्र राखीवमधील सर्व सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, प्राणीमित्र नाना खामकर, पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार उपस्थित होते.
सुरवातीस मान्यवरांचेहस्ते वटवृक्षास पाणी घालून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रस्ताविक किरण जगताप, उपसंचालक, कोयना वन्यजीव विभाग यांनी केले . सह्याद्री व्याघ्र राखीवच्या मागील 15 वर्षातील कामगिरीचा थोडक्यात आढावा त्यांनी मांडला. तद्नंतर सह्याद्री व्याघ्र राखीवसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या आय.सी.आय.सी.आय फौंडेशन, कृष्णा विश्व विद्यापीठ, आनंदवन फौंडेशन, सह्याद्री वाईल्डलाईफ फौंडेशन, महाराट्र टाईम्स, तरुण भारत महा एम टी बी, रोव जंगली युट्युब, वाईल्ड लाईफ इस्थमस, द ग्रासलॅण्ड पुणे, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड, दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मसूर यांचे प्रतिनिधींचा सह्याद्री व्याघ्र राखीवच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन, केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सुरु असलेल्या व्याघ्र पुनर्स्थापना (ऑपरेशन तारा) कार्यक्रमांतर्गत सह्याद्री व्याघ्र राखीवमधील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सह्याद्रीमध्ये निसर्ग अधिवास निर्माण झालेल्या अशा एकूण पाच वाघांची यशोगाथा सांगणाऱ्या चित्रफितींचे अनावरण करण्यात आले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करताना अनेक अनुभव आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास नंबर वन बनवायचं असून ऑपरेशन चंदा व तारा वाघिणीची मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चांगल्या प्रकारे बनवायचं असून त्यासाठी प्रकल्पातील प्रत्येकजण परिश्रम घेत असल्याची माहिती तुषार चव्हाण यांनी दिली रोहन भाटे म्हणाले, 2006 व 2007 साली सह्याद्रीत वाघ होते. सह्याद्रीमध्ये तीन नर वाघ आहेत. आता दोन वाघिणी आल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे. नाना खामकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहलता पाटील, यांनी आभार मानले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.