सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‌‘सरदार‌’चा दबदबा 
सांगली

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‌‘सरदार‌’चा दबदबा

राधानगरीच्या जंगलात नव्या नर वाघाचा वावर; रायबापेक्षाही बलाढ्य; वाघांची संख्या झाली नऊ

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या राधानगरीच्या जंगलात ‌‘सरदार‌’ नावाने ओळखला जाणारा एसटीआर-टी 8 हा नवा नर वाघ गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास असून, त्याचा वावर वाढताना दिसत आहे. राधानगरी परिसरात फिरणाऱ्या रायबा (एसटीआर-टी 7) वाघापेक्षाही हा वाघ अधिक बलाढ्य आणि मोठ्या क्षेत्रात वावरणारा असल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

राधानगरी आणि दाजीपूर परिसरात काही महिन्यांपूर्वी नव्या वाघाच्या हालचाली आढळून आल्या होत्या. अभ्यासानंतर हा वाघ रायबापेक्षा वेगळा व वयाने मोठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचे ‌‘एसटीआर-टी 8‌’ असे नामकरण करून त्याला ‌‘सरदार‌’ असे नाव देण्यात आले आहे. साधारण पाच वर्षांचा असलेला हा वाघ इतर कोणत्याही डेटाबेसमध्ये नोंदलेला नसून, तो प्रथमच राधानगरी अभयारण्यातच आढळून आला आहे.

23 फेब्रुवारी 2025 रोजी सरदार वाघाचा पहिला फोटो टिपण्यात आला होता. त्यानंतर 29 मार्च 2025 रोजी त्याचे पुन्हा दर्शन झाले. मात्र, त्यानंतर वर्षभर हा वाघ दिसला नसल्याने तो राधानगरी सोडून गेल्याची शंका व्यक्त होत होती. 18 जानेवारी 2026 पासून पुन्हा त्याचे दर्शन घडू लागले असून, सध्या तो येथे स्थिरावल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT