सांगली : सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल पंपांची परस्थिती शुक्रवारीही ‘जैसे थे’ होती. दिवसभर अनेक पंप बंद राहिले; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांनी गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी केल्याने सुरू असलेल्या पंपांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र होते.
सांगली जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बीपीसीएलचा 610 किलोलिटर व एचपीसीएलचा 530 किलोलिटर असा एकूण 2460 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1445 किलोलिटर, बीपीसीएलचा 780 किलोलिटर व एचपीसीएलचा 650 किलोलिटर असा एकूण 2875 किलोलिटर साठा शिल्लक आहे.
एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 396 टन, आयओसीएलचा 55 टन व बीपीसीएलचा 116.3 टन असा एकूण 567.3 टन साठा शिल्लक आहे. बीपीसीएलचा 83.1 टन एलपीजी मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.