देशिंगच्या मयूर पतसंस्थेत ७२ लाखांचा घोटाळा  File Photo
सांगली

Sangli News : देशिंगच्या मयूर पतसंस्थेत ७२ लाखांचा घोटाळा

लेखापरीक्षणात गैरव्यवहार उघड; सचिव, लिपिकासह तिघांना कोठडी; सोने तारण कर्जात अफरातफर

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : हरोली-देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील मयूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ७१ लाख ७८हजार ६०० रुपयांचा आर्थिक अपहार आणि फसवणूक झाल्याचा प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे. संस्थेच्या तत्कालीन सचिव, लिपिक आणि सचिव-कॅशिअर यांनी संगनमत करून सोने तारण कर्ज, ठेव तारण कर्ज, रोख रक्कम आणि सोने गहाण लॉकर व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद प्राधिकृत अधिकारी साहेबराव आनंदराव कदम (वय ५०, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ) यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संतोष बाबासाहेब देसाई (रा. देशिंग), शहाजी संजय तोरसे (रा. बनेवाडी, ता. कवठेमहांकाळ) आणि सचिन यशवंत कुलकर्णी (रा. देशिंग) यांचा समावेश आहे. पोलिसांना कुलकर्णी सापडलेला नाही, अन्य दोघांना अटक झाली आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT