सूरज पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, मारामारी तसेच एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हे दाखल आहेत. त्याला मार्च 2026 पर्यंत जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. परंतु हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिरान येथे आला होता.
कवठेपिरान येथील त्याचा साथीदार राजेंद्र शिंदे याने परिसरातील एका गावातील व्यक्तीस 20 हजार रुपये उसने दिले होते. त्यापैकी 12 हजार रुपये परत मिळाले. उर्वरित पैसे लवकर मिळत नसल्यामुळे शिंदे हा सूरजला घेऊन रविवारी रात्री साडेआठ वाजता संबंधिताच्या घरी गेला. तेथे पीडित महिलेस शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. पीडितेने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री साडेदहा वाजता येऊन फिर्याद दिली.

पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कवठेपिरान येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक ईस्माईल तांबोळी, सहायक फौजदार मेघराज रूपनर, हवालदार बंडू पवार, अभिजित पाटील, विष्णू काळे, हिम्मत शेख यांच्या पथकाने कारवाई केली.