Registered AD service : रजिस्टर एडी सेवा 1 सप्टेंबरपासून होणार बंद File Photo
सांगली

Registered AD service : रजिस्टर एडी सेवा 1 सप्टेंबरपासून होणार बंद

पोस्टाच्या स्पीड सेवेने जलद, कार्यक्षम सेवा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : डाक विभागात एपीटी अ‍ॅप्लिकेशन ही सुधारित प्रणाली सांगली व मिरज मुख्य टपाल कार्यालय आणि त्याअंतर्गत येणार्‍या उपटपाल कार्यालयात लागू केली आहे. याबरोबरच आता 1 सप्टेंबरपासून पारंपरिक ‘नोंदणीकृत पत्र’ सेवा (रजिस्टर एडी) बंद केली आहे. ब्रिटिश काळापासून सुरू असलेली शिस्तबद्ध आणि कायदेशीर मूल्य असलेली ही सेवा आता काळाच्या पडद्याआड जात आहे. ही जागा आता स्पीड पोस्ट सेवा घेत आहे.

एपीटी अ‍ॅप्लिकेशन सेवा जलद, अधिक ग्राहकस्नेही इंटरफेस प्रदान करणार आहे. त्याचबरोबर स्पीड पोस्ट सेवेमुळे आता रजिस्टर एडी सेवा बंद होणार आहे. नव्या सेवेमध्ये ट्रॅकिंग, पोहोच पावती,कायदेशीर दस्तऐवजांची पाठवणी या सुविधा आहेत. ‘नोंदणीकृत पत्र’ म्हणजे एक कायदेशीर दस्तावेज होता. परीक्षा निकाल, न्यायाल यीन नोटीस, सरकारी आदेश किंवा गावातील एखाद्याची महत्त्वाची सूचना हे सर्व नोंदणीकृत पत्राने पोहोचविले जात असे. नवीन प्रणालीतून सेवांचा वेग, ट्रॅकिंगची सुविधा आणि डिजिटल युगाशी जुळवून घेणारी आहे.

अशी आहे सुविधा...

रजिस्टर हे स्पीड पोस्टाने जाणार आहे. रजिस्टर घेणार्‍याला ओटीपी क्रमांक जाणार आहे. हे सांगितल्यानंतर संबंधिताकडून हा क्रमांक घेऊन त्यांना रजिस्टर देण्यात येणार आहे. घेताना त्यांचे पोस्टमन मोबाईलच्या स्क्रीनवर बोटाने सही घेणार आहे. जर घर बंद असेल तर तसा फोटो घेऊन पाठवणार्‍याला देण्यात येणार आहे. या सेवेमध्ये रजिस्टर कोठे आहे, याचा स्टेटसही ऑनलाईन कळणार आहे. यामध्ये विमानसेवाही मिळणार आहे, अशी माहिती पोस्टाचे अधीक्षक बसवराज वालिकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT