आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब पणन संकुलात शुक्रवारी डाळिंबांची विक्रमी आवक झाली. Pudhari Photo
सांगली

Atpadi pomegranate market: आटपाडीत डाळिंबाची विक्रमी आवक

तब्बल 25 टन आवक : महसुलात नवा टप्पा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारी आपल्या कामगिरीचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. भगवा जातीच्या डाळिंबाची तब्बल 25 टन आवक नोंदवून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून तब्बल 1,14,131 रुपये महसूल मिळाला, तर शासन महसूलही 11,403 रुपये झाला. पारदर्शक कारभार, आधुनिक सोयी-सुविधा आणि शेतकरीहिताच्या उपक्रमांमुळे आटपाडी बाजार समितीने महसूल वाढीत नवा टप्पा गाठला आहे.

आटपाडी बाजार समितीतील आधुनिक पॅकिंग सेंटर, व्यापार्‍यांसाठी अनुकूल सुविधा, शेतकर्‍यांसाठी सुलभ व्यवहार पद्धती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाचा विश्वास दृढ झाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आटपाडी बाजार समितीने 22 वा क्रमांक आणि कोल्हापूर विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव आणि संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीची वेगाने प्रगती होत असून कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळे हा विक्रम शक्य झाल्याचे मानले जात आहे.

आटपाडी बाजार समितीने महसूल आणि व्यवस्थापनात नवा इतिहास घडवला आहे. आज आम्ही राज्यात 22 वा क्रमांक आणि कोल्हापूर विभागात अव्वल स्थान मिळवले आहे, याचा अभिमान वाटतो. पारदर्शक कारभार, आधुनिक सुविधा, संचालकांची साथ आणि कर्मचार्‍यांची मेहनत या यशामागची खरी ताकद आहे. शेतकर्‍यांना आणखी चांगल्या सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- संतोष पुजारी, सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT