तासगाव शहर : यंदा द्राक्षे कमी पिकल्याने द्राक्षांना आणि बेदाण्याला प्रचंड मागणी होऊ लागली आहे. तासगाव बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बेदाण्यास 651 रुपयांचा विक्रमी दर मिळाला. भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनीमध्ये बेळुंडगी (ता. जत) येथील नागाप्पा शरणाप्पा हाडगे यांच्या 345 किलो बेदाण्याला हा दर मिळाला.
यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे मागणी वाढली आहे. प्रति किलो 140 ते 200 रुपये दर मिळत आहे. यामुळे बेदाणादेखील कमी झाला आहे. पर्यायाने दर वाढला आहे. तासगाव बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच 651 रुपये दर मिळाला. याचवेळी उमदी (ता. जत) येथील शेतकरी संजय बसाप्पा लोणी यांच्या 765 किलो बेदाण्याला 511 रुपये दर मिळाला. व्यापारी मनोहर सारडा यांनी हा बेदाणा खरेदी केला. शनिवारी एक हजार 700 टन बेदाण्याची आवक झाली तर एक हजार 50 टन बेदाण्याची विक्री झाली. हिरव्या बेदाण्याला सरासरी 210 ते 651, पिवळा बेदाणा 180 ते 255 तर काळ्या बेदाण्याला 80 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळाला.
यावेळी किरण बोडके, जगन्नाथ घणेरे, सुदाम माळी, बबलू पाटील व व्यापारी उपस्थित होते. शेतकर्यांनी बेदाणा तासगाव बाजार समितीत सौद्यास आणावा, असे आवाहन सभापती युवराज पाटील यांनी केले.