सोनी : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वर कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग फाटा येथे बुधवारी सकाळी दुभाजक ओलांडणार्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुनील बाबुराव बन्ने (वय 44, रा. कोळेकर मळा, मिरज) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी घडली.
मिरजेहून सोलापूरकडे जाणारी कार (एम एच 10, ई के 9397) जात होती. त्याचवेळी दुचाकी (एम एच 10 बी टी 8178) ही दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येत असताना दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार सुनील बन्ने यांचा जागीच मृत्यू झाला.