लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार File Photo
सांगली

लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार

इंदापूरच्या तरुणावर गुन्हा ः पीडितेची 12 लाखाला फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : इन्स्टाग्रामवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत सांगलीतील तरुणीवर बलात्कार करून 12 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित ऋषिकेश ब्रह्मदेव माळी (रा. वकील वस्ती, इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता सांगलीत खासगी नोकरी करते. संशयित माळी याच्याशी त्यांची जून 2023 मध्ये इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यानंतर माळी याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने तिच्याकडून 10 लाख 28 हजार 698 रुपये व 2 लाख 71 हजार 302 रुपयांचे सोन्याचे दागिने असा 13 लाख रुपयांचा ऐवज घेतला.

माळी याने पीडितेला लग्न करणार असल्याचे सांगून धामणीजवळील हॉस्पिटलशेजारी असलेल्या शेतात, धामणीत रस्त्याकडेला शेतात तसेच तासगाव येथील बसस्थानकाजवळील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी 2025 पर्यंत माळी याने पीडितेशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न करणे टाळले. पीडितेने याबाबत त्याला वारंवार विचारणा केली. तसेच घेतलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर 13 लाख रुपयांपैकी केवळ एक लाख रुपये परत केले. उर्वरित बारा लाख रुपये अद्याप दिले नाहीत.

माळी याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार माळी याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT