सिंधुदुर्गात जन्मलेला ‌‘राणोजी‌’ राधानगरीत स्थिरावतोय  
सांगली

Ranoji tiger : सिंधुदुर्गात जन्मलेला ‌‘राणोजी‌’ राधानगरीत स्थिरावतोय

राधानगरी अभयारण्यात ‌‘रायबा‌’, ‌‘सरदार‌’ आणि ‌‘राणोजी‌’ अशा तीन नर वाघांचा वावर

पुढारी वृत्तसेवा

वारणावती : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात मागील एक महिन्यापासून नव्या वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. हा वाघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे जन्मलेला एसटीआरटी-10 अर्थात ‌‘राणोजी‌’ असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. सह्याद्री-कोकण पट्ट्यातील हा वाघ सध्या राधानगरी परिसरात स्वतःचा अधिवास (टेरिटरी) निर्माण करत आहे.

वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2024 रोजी राधानगरीत राणोजीचे पहिले छायाचित्र टिपले गेले. त्यानंतर 2025 मध्ये त्याचे छायाचित्र न मिळाल्याने त्याच्या हालचालींबाबत साशंकता होती. मात्र, 3 मार्च 2026 रोजी पुन्हा एकदा त्याचे अस्तित्व राधानगरीत स्पष्ट झाले. साधारण सहा वर्षांचा हा वाघ सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमण मार्गातील असून त्याचा मूळ सांकेतिक क्रमांक एसकेटी-22 असा आहे.

राणोजीची आई एसकेटी-12 ही सह्याद्रीतील ज्येष्ठ वाघिणींपैकी एक मानली जाते. 2021 मध्ये दोडामार्ग परिसरात तिचा पहिला व्हिडिओ टिपण्यात आला होता. त्याच परिसरात एसकेटी-13 हा प्रौढ नर वाघ वावरत होता. या दोघांच्या मिलनातून 2022 मध्ये दोन पिल्लांचा जन्म झाला. त्यापैकी नर पिल्लू म्हणजेच एसकेटी-22 हा सध्याचा एसटीआरटी-10 अर्थात ‌‘राणोजी‌’ होय. सध्या राधानगरी अभयारण्यात ‌‘रायबा‌’, ‌‘सरदार‌’ आणि ‌‘राणोजी‌’ अशा तीन नर वाघांचा वावर असल्याने येथे मादी वाघीण स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे.

सध्याची राधानगरीतील वाघस्थिती

रायबा (नर - एसटीआरटी-07)

सरदार (नर - एसटीआरटी-08)

राणोजी (नर एसटीआरटी-10)

मादी वाघीण स्थलांतराची मागणी वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT