विवाहितेचा छळ File Photo
सांगली

Sangli Crime : पुण्यात फ्लॅटसाठी पैशाची मागणी; विवाहितेचा छळ

पती, सासूविरोधात जत पोलिसात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

जत : पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, अन्यथा नांदवून घेणार नाही, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्मिता प्रवीण चव्हाण (वय 30, सध्या रा. तिप्पेहळ्ळी, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रवीण केशव चव्हाण आणि सासू भारती केशव चव्हाण (दोघे रा. आरवडे, ता. तासगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच फिर्यादीस ‌‘तू गावंढळ आहेस, तुझ्याबरोबर फिरण्यास लाज वाटते,‌’ असे बोलून पतीने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच सासूने पतीला भडकावून फिर्यादीस मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादीचे आई-वडील भेटण्यासाठी सासरी आले असता आरोपींनी पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास नांदवून घेणार नसल्याची धमकी देत फिर्यादीस माहेरी पाठवून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. माहेरी राहत असतानाही फोनवरून शिवीगाळ व मानसिक त्रास देणे सुरूच असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT