सांगली : 'नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास' असा मंत्र जपत स्वप्नवत पर्यटनस्थळांचा शोध घेण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा 'ऑन द स्पॉट' अनुभव घेण्याची संधी साधण्यासाठी उत्सुक सांगलीकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. सांगलीचे पर्यटनप्रेमी ज्या क्षणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, त्या बहुप्रतिक्षित 'गगन टूर्स' प्रस्तुत 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' पॉवर्ड बाय 'अ हेवन हॉलिडे' ला शुक्रवार दि. ७ पासून सांगलीत दिमाखात सुरुवात होत आहे.
कोल्हापुरातील अभूतपूर्व प्रतिसादानंतर हे प्रदर्शन आता सांगलीत भरवले आहे. कच्छी जैन समाज भवन, राम मंदिर चौक, सांगली-मिरज रोड, सांगली येथे सकाळी १०.३० वाजता सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाला केवळ सांगली-मिरज परिसरातूनच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देतात. एकाच छताखाली देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असल्याने, सुटीच्या काळात कुठे आणि कसे फिरायचे याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे माहितीचा आणि नवनवीन पर्यायांचा खजिना ठरत आहे.
'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन' हे केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रॅव्हल उद्योगासाठी महत्त्वाचा इव्हेंट आहे. संपूर्ण वर्षभरातील पर्यटन व्यवसायाला या प्रदर्शनामुळे एक नवी दिशा मिळते. या तीन दिवसांत मिळणारा प्रतिसाद ट्रॅव्हल कंपन्यांना वर्षभराच्या व्यवसायासाठी मोठा हातभार लावतो. याच कारणामुळे देशातील आघाडीच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांची या प्रदर्शनाला नेहमीच पहिली पसंती असते. 'पुढारी न्यूज', 'पुढारी ऑनलाईन' आणि 'टोमॅटो एफएम आपलं एफएम'च्या व्यापक प्रसिद्धीमुळे हा पश्चिम महाराष्ट्रातील ट्रॅव्हल क्षेत्रातील सर्वांत मोठा महोत्सव ठरत आहे.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व खास आकर्षण...
एकाच छताखाली सर्व माहिती : देश-विदेशातील नामांकित ट्रॅव्हल एजन्सींचे प्रतिनिधी थेट मार्गदर्शनासाठी उपलब्ध.
विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळ यांसारख्या देशांतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पटाया यांसारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची परिपूर्ण माहिती.
खास पॅकेजेस व सवलती : कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस आणि सोलो ट्रिप्सवर विशेष सवलती व आकर्षक 'अर्ली-बर्ड' डिस्काउंट्स.
तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : व्हिसा प्रक्रिया, पासपोर्ट मार्गदर्शन, प्रवास नियोजन आणि बजेटनुसार सहल कस्टमाईज करून घेण्याची उत्तम सोय.
प्रदर्शन व संपर्क तपशील
दिनांक : ७, ८ व ९ ऑगस्ट २०२६
वेळ : स. १०:०० ते सायं. ८:००
स्थळ : कच्छी जैन समाज भवन, राम मंदिर चौक, सांगली-मिरज रोड, सांगली.
संपर्क : 8149582442