सांगली : अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्या सत्कारप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, मिलिंद गाडगीळ, सिध्दार्थ गाडगीळ, रुपचंद कांबळे, सुरेश गुदले, युवराज पानारी, राहुल शिंगणापूरकर, आर. जे. शरद आदी.  
सांगली

Pudhari Natyamahotsav : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट'च्या हास्यकल्लोळात रसिक चिंब

पुढारी नाट्यमहोत्सवाची उत्साहात सांगता; रसिकांकडून टाळ्यांचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

सांगली : प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाट्यप्रयोगाने ‘पुढारी नाट्यमहोत्सवा’ची मंगळवारी सांगता झाली. हाऊसफुल्ल असलेला या प्रयोगाचा खेळ चांगलाच रंगला. पती-पत्नीच्या नात्यातील नानाविध पैलूंवर झोत टाकणाऱ्या या प्रयोगावर रसिकांनी टाळ्यांची एकच बरसात केली. सुमारे दोन तास भावे नाट्यगृह हास्यकल्लोळात बुडाले होते.

तीन दिवस झालेल्या या नाट्यमहोत्सवास लक्षणीय प्रतिसाद लाभला. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाट्यप्रयोगास रसिकांनी दाद तर दिलीच, शिवाय प्रयोग झाल्यानंतर कलाकारांशी संवाद साधण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठीही रसिक थांबलेले होते. कलाकारांनी हरेक रसिकास प्रतिसाद दिला, संवाद साधला. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढी हे होते. 'एलआयसी' आणि येवलेज्‌ मिल्क कॉर्नर हे सहयोगी प्रायोजक होते. अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांची उत्तम केमिस्ट्री आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, ‘पीएनजी’ सराफ पेढीचे संचालक मिलिंद गाडगीळ, सिध्दार्थ गाडगीळ, एलआयसी ऑफ इंडियाचे सांगली शाखा व्यवस्थापक रुपचंद कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा सत्कार ‘पुढारी’ सांगली आवृत्तीचे निवासी संपादक सुरेश गुदले, शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर यांच्याहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता लाड-मेढेकर, अद्वैत दादरकर, पूर्वा भिडे, राजश्री चिटणीस, राजसिंह देशमुख, चिन्मय सराफ आदींचा सत्कार आमदार सुधीर गाडगीळ, मिलिंद गाडगीळ, सिध्दार्थ गाडगीळ, रुपचंद कांबळे यांच्याहस्ते करण्यात आला. ‘९१.९ आपलं एफएम’चे आर. जे. शरद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सिध्दार्थ गाडगीळ यांचा वाढदिवस साजरा

‘पीएनजी’ सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ गाडगीळ यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्यरसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करून गाडगीळ यांना शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT