Pudhari Kasturi Club
सांगली

सांगली : पुढारी कस्तुरी क्लब साधणार सौंदर्यवतींच्या सत्काराचा सुवर्णयोग

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली नगरीत पहिल्यांदाच पुढारी कस्तुरी सौैंदर्य स्पर्धा प्रचंड उत्साहात यशस्वी झाल्या. सांगलीसोबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुली आणि महिलांचे विश्वच या स्पर्धेने बदलून टाकले. ही स्पर्धा झाल्यानंतर आता या स्पर्धेचे ज्वेलरी पार्टनर तनिष्क ज्वेलर्स या मिस आणि मिसेस यांचे यश सेलिब्रेट करणार आहे. ‘तनिष्क’ या कस्तुरी सौंदर्यवतींच्या सत्काराचा सुवर्णयोग साधणार असून 27 रोजी सांगलीत हा सोहळा रंगणार आहे. यानिमित्त स्पर्धेनंतर मिस आणि मिसेसना पुन्हा एकत्र येण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

सांगलीत पहिल्यांदाच पुढारी कस्तुरी सौैंदर्य स्पर्धा 2024 पार पडल्या. यात 25 मिस आणि 25 मिसेस अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे, आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. या स्पर्धेचे ज्वेलरी पार्टनर तनिष्क ज्वेलर्स त्यांच्या या प्रवासात यशापर्यंत सोबत होते.

या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या 25 मिस आणि 25 मिसेस यांचा तनिष्कच्यावतीने भेटवस्तू देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी 27 रोजी सकाळी 11 वाजता एसएफसी मेगा मॉलमधील तनिष्क ज्वेलर्स शोरूममध्ये हा सोहळा रंगणार असून तनिष्कचे संचालक प्रसाद कामत, जय कामत, वैभव पाटील, ‘पुढारी’चे नॅशनल हेड आनंद दत्त, दि सिल्युएट डिझाईन स्टुडिओच्या संचालिका श्वेता दस्सानी व नवराई ब्युटी स्टुडिओच्या संचालिका पूनम अधिवेद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानिमित्त या सार्‍या सौैंदर्यवतींना पुन्हा एकत्र येण्याची संधी ‘तनिष्क’मुळे मिळाली आहे.

मिस...

हर्षाली बेलवलकर, तनिष्का गुजर, प्रगती शेळके, साक्षी गिड्डे, रचना पाटील, वैष्णवी मगर, प्रशांती तोडकर, सानिका रजपूत, योगिनी धस, गायत्री घोडे, श्रुती तोडकर, श्रेया तोडकर, समृद्धी करंजकर, मंजिरी पाटील, अंजली पाटील, वैष्णवी संकपाळ, करीन खताते, नीलिमा वोरा, श्रावणी पाटील, प्राची व्यवहारे, इशा कोलप, शिवानी सूर्यवंशी, वेदश्री पटवर्धन, ऐश्वर्या कुलकर्णी, आर्या उरूणकर.

मिसेस...

रोशनी कदम, कपिला पाटसूपे, अस्मिता खटावकर, प्रतिभा पाटील, दीपाश्री सकटे, सुप्रिया शिंदे, मोहिनी तोडकर, डॉ. नीलम पाटील, काजल सव्वाशे, डॉ. गीता गंगवाणी, कस्तुरी गायकवाड, सरस्वती खोकले, अखिला पाटील, पूनम रायगांधी, प्राजक्ता मदने, संतोषी मानधना, शीतल यादव, वृंदा लिमये, मनोरमा कांबळे, मधुरिता जाधव, मोनिका रजपूत, राधिका आदाटे, रेश्मा नानवानी, शोभा रोचलानी, नेहा खापरे.

असा असेल कार्यक्रम

दिनांक - 27 जुलै, 2024 ठिकाण - टाटा तनिष्क ज्वेलर्स एस.एफ.सी. मेगा मॉल,

स्टेशन चौक सांगली.

संपर्क - 70201 39480

वेळ - सकाळी 11.00 वाजता

प्रवेश निमंत्रितांसाठीच

SCROLL FOR NEXT