ईश्वरपूर : पुढारी कस्तुरी क्लब आणि कपिल ओसवाल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मागील वर्षीच्या लकी ड्रॉ ची सोडत पार पडली. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजेत्यांचे अभिनंदन केले. या लकी ड्रॉ साठी राजमाने ब्रदर्स यांच्यावतीने पाच आकर्षक गिफ्ट हॅम्पर प्रायोजित करण्यात आले होते. सोडतीत ईश्वरपूर, साखराळे, गोटखिंडी आणि रेठरेहरणाक्ष परिसरातील ग्राहकांना गिफ्ट हॅम्पर मिळाले.
विजेत्यांमध्ये उषा सुनील पाटील (ईश्वरपूर), अर्चना परीट (साखराळे), हर्षदा अशोक घारे (गोटखिंडी), मनीषा पवार (रेठरेहरणाक्ष) आणि राधिका चौगुले (ईश्वरपूर) यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांचा उत्साह वाढला असून, पुढीलवर्षीही अशाच आकर्षक योजनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी मधू देसावळे मोबा. ८३०८७०६१२२ वर संपर्क साधावा.
राजमाने ब्रदर्समध्ये आधुनिक फर्निचर...
ईश्वरपूर परिसरातील दुष्यंत राजमाने यांचे राजमाने ब्रदर्स हे दर्जेदार व आधुनिक फर्निचरसाठी ग्राहकांच्या विश्वासार्ह पसंतीचे ठिकाण बनले आहे. लग्नसराई, वास्तुशांती, गृहप्रवेश तसेच इतर विविध समारंभांसाठी आवश्यक असणारे फर्निचर येथे उपलब्ध आहे. आधुनिक व आकर्षक फर्निचर वाजवी दरात उपलब्ध करून दिले जाते. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि समाधानकारक सेवा यामुळे या प्रतिष्ठानने परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.