सांगली : ‘दहावी आणि बारावीनंतर पुढे काय?’ असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्ग शोधत असलेल्या पालकांसाठी दै. ‘पुढारी’ घेऊन आले आहे खास शैक्षणिक प्रदर्शन ‘एज्युदिशा २०२६’. शैक्षणिक करिअरच्या नवनवीन वाटा आणि संधींची दालने उघडणारे लोकप्रिय शैक्षणिक प्रदर्शन ‘पुढारी एज्युदिशा २०२६’ हे १२ ते १४ जून २०२६ या कालावधीत सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे.
करिअरचे आधुनिक आणि पारंपरिक पर्याय
या प्रदर्शनात केवळ पारंपरिक कोर्सेसच नव्हे, तर काळाची पावले ओळखून भविष्याचा वेध घेणारे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, डिफेन्स अशा क्षेत्रांसोबतच एआय (AI), डेटा सायन्स, रोबोटिक्स, अॅग्रो टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील संधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून घेता येणार आहे. विशेषतः ‘न्यू एज स्किल्स’ आणि ‘ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज’ (परदेशातील शिक्षणाच्या संधी) यावर विशेष भर दिला जाणार आहे.
दिग्गज संस्थांचा सहभाग
या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर’ असून, ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे’ हे पावर्ड बाय प्रायोजक आहेत. यासोबतच एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप, डीआयसीई (DICE) डेक्कन इन्स्टिट्यूट हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. याशिवाय अन्य दिग्गज शैक्षणिक संस्थांचे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित संस्थांशी थेट संवाद साधण्याची ही दुर्मीळ संधी आहे. करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी या भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
‘पुढारी परिवार’ नेहमीच गुणवत्तेचा सन्मान करतो. या प्रदर्शनादरम्यान दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
ठिकाण आणि वेळ
हे प्रदर्शन सांगली-मिरज रोडवरील कच्छी जैन भवन (राम मंदिर कॉर्नर) येथे होणार असून, ते सकाळी १०.00 ते रात्री ८.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
दि. १२, १३ आणि १४ जून
संपर्क व नोंदणी
विद्यार्थी, पालक किंवा शाळांनी विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेजचे नाव आणि मार्कशीटची प्रत पाठवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ९५४५३२७५४५