सांगली : सीईटी, कॅप राऊंडबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती, टॉप कोर्सेसबाबत माहिती, करियरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती, स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून थेट कौसिलिंग.. याबाबतची सारी माहिती एकाच दिवशी, एकाच ठिकाणी मिळण्याची संधी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित ‘पुढारी : कॅम्पस टू करियर’ या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनारमधून मिळणार आहे.
बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतरच खऱ्या अर्थाने करियरला दिशा मिळत असते. या वळणावर विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने ‘पुढारी : कॅम्पस टू करियर’ या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनारचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना तीन विद्यापीठांना भेट देण्याची संधीही मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५७००१७००३